Actor Santosh Juvekar : 1800 हून अधिक वृक्षतोडीच्या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध; अभिनेता संतोष जुवेकर यांचा प्रशासनाला भावनिक ‘पर्याय निवडा’ विनंती; राजकीय वातावरण तापले
नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवन येथील 1800 हून अधिक वृक्ष तोडण्याच्या प्रशासकीय निर्णयाविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) जोरदार एल्गार पुकारला आहे. आज मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवन येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
‘झाडे वाचवा, तपोवन वाचवा’ अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिनेत्याची भावनिक विनंती
अभिनेते संतोष जुवेकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी प्रशासनाला भावनिक विनंती केली की, प्रशासनाने दुसरा पर्याय निवडून ‘वृक्षहत्या रोखावी’.
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला यापूर्वी पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. आता मनसेसारखे राजकीय पक्षही मैदानात उतरल्याने या तपोवन येथील वृक्षतोडीविरोधातील लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…