•रविवारी जम्बो पक्षप्रवेश सोहळा; सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यासह अनेकजण भाजपमध्ये
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू केले आहे. येत्या रविवारी (28 जुलै) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला मोठे धक्के बसणार असून, अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) चे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या काळात भाजपमध्ये अनेक मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. रविवारी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या पक्षप्रवेशांबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. राहुल दिवे यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे. अजूनही ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी आमच्या संपर्कात असून, लवकरच तेही भाजपमध्ये येतील.” पक्षप्रवेश नाशिकमध्येच का होत आहेत, या प्रश्नावर केदार म्हणाले, “प्रवेश स्थानिक पातळीवरच व्हावेत, अशी आमची आणि प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचीही इच्छा होती. त्यामुळे आगामी काळातही नाशिकमध्येच मोठे पक्षप्रवेश होतील.”
नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिलेला ‘100 प्लस’चा नारा फोल ठरेल, अशी टीका काँग्रेसने केली आहे. यावर सुनील केदार यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. “काँग्रेसचा हा भ्रमनिरास आहे. देशात, राज्यात आणि शहरात काँग्रेसचे अस्तित्वच उरलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून अशी वैफल्यग्रस्त वक्तव्ये होत आहेत,” असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…