•महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली; गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वाजतगाजत प्रवेश
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नुकतेच हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ, ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी रविवारी (27 जुलै) भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश केला. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. या वेळी महाजन यांनी बागूल यांना “हा शेवटचा प्रवेश आहे, आता इकडेतिकडे जाऊ नका,” असा सल्ला देत टोलाही लगावला.
भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे पक्ष सध्या विरोधी पक्षांतील, विशेषतः ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र, या पक्षप्रवेशांवरून ठाकरे गट भाजपवर गंभीर आरोप करत आहे. ठाकरे गटाच्या मते, भाजप आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते आणि नंतर त्यांचा पक्षात प्रवेश घडवते. या आरोपांसाठी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप असलेले सुधाकर बडगुजर आणि महिनाभरापूर्वी मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल झालेले बागूल व राजवाडे यांचा दाखला दिला. विशेष म्हणजे, बागूल आणि राजवाडे यांच्याविरुद्धची तक्रार देणाऱ्याने अचानक आपली तक्रार मागे घेतली असून, हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानेच तक्रार मागे घेतल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले होते.बागूल समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रचंड गर्दी जमवून आपले शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भाजपचे स्थानिक आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे देखील उपस्थित होते.
“नाशिक भाजप आता हाऊसफुल”: गिरीश महाजन
सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सर्वच प्रमुख पदाधिकारी आता भाजपमध्ये आले आहेत, त्यांच्याकडे आता अध्यक्ष होण्यासही कोणी तयार नाही.” त्यांनी ठाकरे गटाचे सध्याचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत नाशिक भाजप आता ‘हाऊसफुल’ झाल्याचे सांगितले. खासदार संजय राऊत यांचा थेट नामोल्लेख न करता महाजन यांनी त्यांच्यावरही टीका करत त्यांच्या पक्षाची बिकट अवस्था झाल्याचे नमूद केले. सुनील बागूल यांनी यावेळी बोलताना, “आता भाजपमध्ये प्रवेश करणे सोपे राहिलेले नाही, संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी आणि पोलीस नोंदी तपासल्या जातात. सर्व अनुकूल असेल तरच प्रवेश मिळतो,” असे सांगितले.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…