Nashik News : 12 फेब्रुवारी पासून आरोग्य मित्रांचा बेमुदत संप ; नाशिक मधून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता दिला इशारा
•आरोग्य मित्रांना किमान 26 हजार रुपये वेतनाची केली मागणी, महागाई भत्ता आणि स्पेशल अलाउन्सची केली मागणी
नाशिक :- केंद्र सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 12 फेब्रुवारी पर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास राज्यभर बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आहे.
आरोग्य मित्र महाराष्ट्रभर मुंबईमध्ये काम बंद आंदोलन करणार आहे. या अगोदर 23 ऑगस्ट 2024 रोजी आरोग्य मित्र संघटनेने एक दिवसीय कामबंद आंदोलन केले आहेत.राज्य आरोग्य
आम्ही सोसायटीने सांगितले की आचारसंहितेपूर्वी आरोग्य मित्रांच्या सर्व मागणी पूर्ण करू तसेच बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचे इतिवृत्त सुद्धा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेला देण्यात आले होते. आचारसंहिता संपून गेली नवीन सरकारची देखील स्थापना झाली. तरी देखील राज्य आरोग्य हमी सोसायटीने आरोग्य मित्रांच्या मागण्याचा विचार केला नाही. आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार 26000 हजार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा आहे.दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढ व्हावी. बदलीचे धोरण रद्द करावे. आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाणे आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे. आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षांपेक्षा जास्त नोकरी होऊन पण उपदान दिले नाही. ते देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.
आरोग्य मित्रांच्या काय आहे मागण्या?
1) आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार 26000/- स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा.
2) दरवर्षी वेतन दहा टक्के पगार वाढ व्हावी
3) आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा.
4) आरोग्यमित्रांना कायदेशीर रजा देण्यात यावे.
5) आरोग्यमित्राचे बदलीचे धोरण रद्द करावे.
6) आरोग्य मित्र रमेश पंडित बसणे आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे.