Mumbai Police News : “ऑपरेशन शोध” मुंबई पोलिसांचे ऑपरेशन शोध मोहीम, नागरिकांना मदत करण्याचे केले आवाहन

•Search Operation Campaign Started By Mumbai Police मुंबई पोलिसांनी हरविलेल्या नागरिकांकरिता विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी या मोहिमेला “ऑपरेशन शोध” असे नाव दिले आहे
मुंबई :- मुंबई पोलिसांनी शहरातील हरविलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी एक मिशन घेतले आहे .”ऑपरेशन शोध” असे या मिशनचे नाव असून यामध्ये नागरिकांनी सहकार्य तसेच मदत करण्याचे ही पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. 17 एप्रिल ते 15 मे या कालावधीत ही विशेष मोहीम पोलिसांकडून राबविण्यात येत आहे.
कालावधीमध्ये मुंबई शहरातून 18 वर्षाखालील हरविलेलेली जास्तीत जास्त बालके व 18 वर्षावरील हरविलेल्या महिला मिळुन येण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहे. मोहिम यशस्वी होण्यासाठी मुंबई मधील नागरिकांनी पोलीस/बालकांसंदर्भात काम करणा-या विविध अशासकीय संस्था यांना मदत केल्यास जास्तीत जास्त हरविलेल्या/अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. तरी मुंबईमधील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या परिसरामध्ये संशयास्पद लहान बालके मिळून आल्यास अगर त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालीलप्रमाणे माहिती संबंधीत विभागांना देवून सदरचा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी मुंबई पोलीसांना मदत करावी.
- कोणताही संशयीत लहान मुलगा/मुलगी मिळुन आल्यास त्यांच्याकडे चौकशी करावी व काही संशयीत वाटल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा अगर सदर बालकास तात्काळ जवळच्या पोलीस ठाणेस घेवून जावे.
- दि.17 एप्रिल ते 15 मे या कालावधीत रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी अथवा कचरा गोळा करणारी लहान मुले/मुली, धार्मिकस्थळे, रुगणालये, हॉटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी लहान मुले/मुली मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षारा 100 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
•आपण रहात असलेल्या परिसरामध्ये लहान मुले/मुली काम करीत असल्याचे मिळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
रेल्वे स्टेशन बाहेरील परिसर/बस स्टेशन बाहेरील परिसर या ठिकाणी बेवारस स्थितीत लहान मुले/मुली मिळुन असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
- आपल्या राहत्या परिसरात नातेवाईकांकडे राहणारी लहान मुले यांचेबाबत काही संशय असल्यास त्याबाबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.
- एखादा अल्पवयीन संशयीत मुलगा/मुलगी वाटल्यास त्याबाबत https://missionvatsalva.wed.gov.in या बेवसाईटवर जावुन khoya paaya या पोर्टलवर मुलगा/मुलीचा फोटो अपलोड करावा.
•आपल्या आजुबाजुच्या परिसरामध्ये कोणी लहान मुलगा/मुलगी घरकाम करताना मिळुन आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 100 अगर 1098 या क्रमांकावर कळवावे अगर लगतच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.


