Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघ आता राजकीय गणित बदलणार का? शांतीगिरी महाराज यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी?
Shantigiri Maharaj On Nashik Lok Sabha Election : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल?
नाशिक :- महाविकास आघाडीकडुन MVA शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही मात्र अनेकांनी अर्ज घेतले आहेत. असे असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. Nashik Lok Sabha Election News Live Updates
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आज शांतीगिरी महाराज Shantigiri Maharaj यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शांतीगिरी महाराज यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.त्यामुळे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतीगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का? Nashik Lok Sabha Election News Live Updates
महायुतीकडून या जागेसाठी हेमंत गोडसे हे इच्छुक आहे. तर, छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी पक्षाचा दावा कायम असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असताना शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे कळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना एबी फार्म दिलेला नाही. त्यामुळे आजूनही संभ्रम कायम आहे. मात्र, तसे झाल्यास भुजबळ व गोडसे दोघांनाही हा मोठा धक्का असणार आहे. Nashik Lok Sabha Election News Live Updates