नाशिकनाशिक

Nashik Lok Sabha Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सीएम एकनाथ शिंदे यांची बॅग तपासली, पोलिसांना काय सापडलं?

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांचे हेलिकॉप्टर उतरल्यावर पोलिसांनी त्यांची बॅग तपासली.

नाशिक :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचे हेलिकॉप्टर आज नगरच्या निलगिरी हेलिपॅडवर Nilgiri Helipad दाखल झाले तेव्हा पोलिसांनी आपोआप त्यांच्या दोन्ही बॅगा तपासल्या. या बॅगेत कपडे, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त काहीही आढळून आले नाही. CM Eknath Shinde Bags Check In Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी केली होती मागणी

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये उतरल्यानंतर त्यातून सुरक्षा रक्षक बॅगा घेऊन जाताना दिसत आहेत. या बॅगांमध्ये पैसे असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. Nashik Lok Sabha Election Live Update

यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली आहे. तसेच कोणताही माणूस अशा उघडपणे पैशांच्या बॅगा घेऊन जाणार नाही, असे विधान केले. या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. त्यावेळी पोलिसांच्या हातात जड बॅगा दिसत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा कशाला लागत आहेत? यामधून कोणता माल नाशिकला पोहचवला जात आहे? तसेच निवडणूक आयोग हे फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप धडधडीत सुरु आहेत. Nashik Lok Sabha Election Live Update

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0