महाराष्ट्र

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .

नाशिक :- लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज Shantigiri Maharaj यांनी आज आपला Nomination उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातून Nashik Lok Sabha Constituency उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिलाच दिवस होता. वास्तविक शांतिगिरी महाराज Shantigiri Maharaj यांनी महायुतीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. एकीकडे महाविकास आघाडीच्या वतीने प्रचारांला सुरुवात देखील झाली आहे. तर दुसरीकडे अद्याप महायुतीचा उमेदवारच निश्चित झालेला नाही. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवार 26 एप्रिलपासून लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी नाशिकमधून 87 तर दिंडोरीमधून 40 अर्जां आले आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांच्यासह महायुतीचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे तसेच समता परिषदेच्या दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज देण्यात आले आहेत. Nashik Lok Sabha Constituency

नाशिकमध्ये प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी अद्याप फायनल नसतानाच महायुतीसाठी इच्छुक असलेल्या घटकांकडून अर्ज देण्यात येत असल्याने राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. याशिवाय शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणात आपले आव्हान कायम असून ही निवडणूक लढणारच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Nashik Lok Sabha Constituency

vivek

Recent Posts