नाशिक

Nashik Hit And Run Case : राज्यात हिट अँड रन चे सत्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या कारलाच धडक…

Nashik Hit And Run Case : नाशिक मध्ये हिट अँड रनची घटना, राज्य उत्पादन शुल्काच्या कारला उडविले, चालक ठार कर्मचारी जखमी

नाशिक :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कार अपघातीचे प्रमाण सातत्याने समोर येत आहे. पुणे घटनेनंतर रविवारी मुंबईच्या वरळी Worli Hit And Run Case परिसरात बीएमडब्ल्यू कारणे नाखवा दांपत्याला उडविले. यामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा पती प्रदीप नाखवा याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे हे प्रकरण ताजे असताना नाशिक मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क राज्य उत्पादन शुल्काच्या कारला धडक Team Of Excise Department Nashik देऊन या धडके कारचालक जागीच मृत्यू पावले असून इतर कर्मचारी जखमी झाले आहे. Nashik Hit Run Case Update Incident With Team Of Excise Department Nashik Accident

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकने उडवले मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव-चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनुल या ठिकाणी ही घटना घडली आहे.

सीमाशुल्क विभागाच्या वाहनांकडून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला जात होता. मात्र यावेळी या ट्रकने पथकाच्या गाड्या उडवल्या. या अपघातामध्ये सीमा शुल्क विभागाचा चालक जागीच ठार झाला आहे. तर लासलगाव येथील पोलिस ठाण्याचे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रकचा करत होते पाठलाग दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड परिसरामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलिस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात संबंधित अधिकारी व कर्मचारी या ट्रकचा पाठलाग करत होते. यावेळी लासलगाव-चांदवड रस्त्यावर असलेल्या हरनुल या ठिकाणी अपघात झाला. Nashik Hit Run Case Update Incident With Team Of Excise Department Nashik Accident

सीमा शुल्क विभागाचा वाहनाचा चक्काचूर या अपघातात सीमा शुल्क विभागाचा वाहनाचा चक्काचूर झाला. तसेच चालक कसबे हे जागीच ठार झाले आहेत. लासलगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी डोंगरी व निकम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र राज्यात सातत्याने घडणाऱ्या या घटना पाहता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. Nashik Hit Run Case Update Incident With Team Of Excise Department Nashik Accident

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0