Nashik Latest Fake Call Center Busted News : नाशिकच्या इगतपुरी प्रकरणाला मनी लॉन्ड्रिंगचा अँगल; अधिकारी लाच घेऊन संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप
मुंबई :- भारतात बसून अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशांतील नागरिकांची बनावट कॉल सेंटर्सच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचे जाळे आता राज्यभर पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. Money Laundering या प्रकरणामुळे अनेक उच्चाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण आरोपींच्या संपर्कात असलेल्या राज्यातील चार वरिष्ठ पोलीस अधिकारी ‘ईडी’च्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. Nashik Fake Call Center Busted
शेकडो कोटींच्या फसवणुकीचा आकडा
परदेशी नागरिकांची फसवणूक करून मिळवलेली रक्कम शेकडो कोटींच्या घरात आहे. ‘ईडी’च्या चौकशीत अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडियन नागरिकांची फसवणूक करून मिळवलेल्या ‘गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा’ (Proceeds of Crime) शोध घेतला जाणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
इगतपुरीमध्ये छापा पडल्यानंतर अप्रत्यक्षपणे या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुख्य आरोपींशी असलेल्या संबंधांमुळे चार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
संरक्षणाचा आरोप: या अधिकाऱ्यांनी लाच घेऊन किंवा सक्रियपणे मदत करून या बनावट कॉल सेंटर्सना संरक्षण पुरवले असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
सीबीआयच्या तपासातून खुलासे: सीबीआयच्या प्राथमिक तपासात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मालमत्ता व्यवहारांचे, त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी डील्सचे तसेच हवाला मार्गे फिरवलेल्या निधीचे ठोस पुरावे समोर आले आहेत. काही अधिकाऱ्यांनी या रॅकेटमधून मिळवलेल्या पैशांचा वापर करून मुंबई, नाशिक, पुणे आणि नवी मुंबई परिसरात मालमत्ता खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.
इगतपुरी कॉल सेंटरची व्याप्ती
सीबीआयने नाशिकमधील इगतपुरी रिसॉर्टमधील एका भाड्याच्या जागेत कार्यरत असलेल्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. या ठिकाणी 62 ऑपरेटर्स काम करत होते आणि आरोपी महिन्याला सुमारे 4 कोटी रुपये कमवत असल्याचे सीबीआयला आढळले होते. छाप्यांमध्ये 1.2 कोटी रुपये बेहिशेबी रोख रक्कम, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या होत्या.
राज्यभर पसरलेले जाळे
यापूर्वी आठ-नऊ वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी अशाच एका मोठ्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला होता. आता हे जाळे पुन्हा सक्रिय झाले असून, अलीकडेच मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथेही पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरवर धाड टाकून अमेरिकेतील नागरिकांना फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…