Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, बस आणि कारच्या धडकेत 2 जणांचा होरपळून मृत्यू
•रविवारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बसने कारला धडक दिली, त्यामुळे कारने पेट घेतला आणि दोघांना आपला जीव गमवावा लागला.
नाशिक :- नाशिक जिल्ह्यात रविवारी राज्य परिवहन बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेने लागलेल्या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाशिक-कळवण रस्त्यावर हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. या धडकेमुळे बस आणि कारला आग लागली. ते म्हणाले की, कारमधील पाच प्रवाशांपैकी दोघे भाजले, तर तीन जणांना पोलिस कर्मचाऱ्यांनी व इतरांनी सुखरूप बाहेर काढले.
अधिकाऱ्याने सांगितले की, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
नाशिक जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली. सरकारी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात 34 जण जखमी झाले. 30 एप्रिल रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरातील आहेर वस्तीजवळ हा अपघात झाला.बस नाशिक शहराकडे निघाली होती. यावेळी ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 45 प्रवासी होते. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून 34 जण जखमी झाले असून त्यांना चांदवड येथील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका 14 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.बसवरील नियंत्रण सुटल्याने अनेक जण बसमधून खाली पडले तर काही लोक बसच्या खिडक्यांना धडकले.