
Naryan Rane On Uddhav Thackeray : “शिवसेना वाढवणाऱ्यांना बाहेर काढलं, सत्ता हरवली — उद्धव यांची धमक संपली”
मुंबई – “राज ठाकरे यांना त्रास दिला, छळ केला, पक्ष सोडण्यास भाग पाडलं… आणि आता त्याच राज यांना परत येण्याची विनंती? उद्धव ठाकरे लाळ ओकत आहेत का?” असा स्फोटक सवाल भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. Naryan Rane On Uddhav Thackeray
राज आणि उद्धव ठाकरे 5 जुलै रोजी एकत्र येणार असून, हिंदी सक्तीविरोधात सरकारने जीआर मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “शिवसेनेसाठी आयुष्य झिजवलेले राज ठाकरे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक यांना बाजूला काढले, सत्ता मिळाली पण ठेवता आली नाही… आणि आता एकजुटीचा नवा खेळ?””मराठी प्रेम दाखवायचं आणि स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवायचं? सरकारने फक्त दोन जीआर मागे घेतले, म्हणून आता विजयोत्सव? हे म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’.”
उद्धव ठाकरे यांनी यावेळी 5 जुलै रोजी होणाऱ्या मेळाव्याला “मराठी विजय दिन” म्हटलं असून, भाजपवरही उपरोधिक टिका केली. “मराठी- अमराठीचा डाव फसल्यावरच सरकारने जीआर मागे घेतले. आम्ही एकत्र आलो म्हणून ते झुकले,” असं ठाकरे म्हणाले.
त्यांनी यावेळी एका विद्यार्थिनीच्या उदाहरणाचा संदर्भ घेत भाजपवर हल्ला चढवला. “कमळी 100 पैकी 100 मार्क मिळवते, पण कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? तिने ईव्हीएम वापरले का?” असा उपरोध करत त्यांनी ‘कमळी एक नंबर’ या वक्तव्यावर टीका केली.


