मुंबई

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन!

•राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला केले अभिवादन

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 134 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन‌ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री‌ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दादरच्या चैत्यभूमी येथे जाऊन भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.

एक्स हँडलवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, सर्व देशवासीयांच्या वतीने, भारतरत्न आदरणीय बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणामआंबेडकरांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यात समर्पित आहे. त्यांची तत्वे आणि आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी, प्रत्येक भारतीयाच्या समान हक्कांसाठी, प्रत्येक वर्गाच्या सहभागासाठी त्यांचे संघर्ष आणि योगदान, संविधानाच्या रक्षणाच्या लढाईत आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करेल.

vivek

Recent Posts