Ind vs Sa T-20 Series : टी-20 विश्वचषक 2026 ची तयारी सुरू! – सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा उद्यापासून दक्षिण आफ्रिकेशी ‘T20’ रणसंग्राम

Ind vs Sa T-20 Series : कटक येथे मालिकेची सुरुवात, ICC क्रमवारीत नंबर 1 भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान; कुठे पाहता येणार सामने? पाहा संभाव्य ‘प्लेइंग इलेव्हन’
Ind vs Sa T-20 Series :- पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका उद्या, 9 डिसेंबर पासून सुरू होत आहे. आयसीसी क्रमवारीत सध्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला (कर्णधार सूर्यकुमार यादव) पाचव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पेलावे लागणार आहे.
पहिला सामना कधी आणि कुठे?
पहिला टी-20 सामना :- 9 डिसेंबर
स्थळ : बाराबती स्टेडियम, कटक (Barabati Stadium, Cuttack)
वेळ : सायंकाळी 6.30 वाजता नाणेफेक आणि 7.00 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कुठे पाहता येणार मालिका?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर पाहू शकता. मोबाईलवर सामने पाहणारे प्रेक्षक जिओहॉटस्टार (JioHotstar) ॲपवर या टी-20 मालिकेतील सर्व सामने थेट पाहू शकतात.
संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक
9 डिसेंबर – कटक
11 डिसेंबर – चंदीगड
14 डिसेंबर – धर्मशाळा
17 डिसेंबर – लखनौ
19 डिसेंबर – अहमदाबाद
पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पहिल्या टी-20 सामन्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात काही प्रमुख खेळाडूंचा समावेश असण्याची शक्यता आहे.
फलंदाज: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा.
अष्टपैलू: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टीरक्षक: जितेश शर्मा (विकेटकीपर).
गोलंदाज: कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा/अर्शदीप सिंग
टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ (Squad):
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा.



