क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kashmira Police News : हरियाणातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी काशिमीरा पोलिसांच्या जाळ्यात

काशिमीरा – १३ सप्टेंबर २०२५ : हरियाणातील जिंद जिल्ह्यातील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर तीन आठवड्यांच्या पाठलागानंतर काशिमीरा गुन्हे Kashmira Police Crime Branch प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या ताब्यात आला. आरोपी सचिन उर्फ बिहारी (वय २७, रा. ग्राम घोपडिया, जिंद, हरियाणा) याला १३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. Mira Bhayandar Kashmira Police Latest News

घटनेचा उलगडा

२९ ऑगस्ट २०२५ रोजी उचाना, जिंद येथे आरोपी सचिन व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीमध्ये गोविंदा रमेश या तरुणाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उचाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५५/२०२५ कलम १०३(१), ६१(२), ११५(२), ३५१, १९०, १९१(२), १९१(३) भा.दं.सं. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिरा रोडमध्ये लपला आरोपी

गुन्ह्यानंतर सचिन उर्फ बिहारी हा हरियाणातून फरार झाला होता. तो मिरा रोड परिसरात आपल्या नातेवाईकांकडे लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हरियाणा पोलिसांचे विशेष तपास पथक महाराष्ट्रात दाखल झाले. काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने कसून शोधमोहीम राबवून अखेर आरोपीला मांडवीपाडा, काशिमीरा येथून जेरबंद करण्यात आले. चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला असून त्याला पुढील कारवाईसाठी हरियाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे व सहायक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी पो.नि. सुशिलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तसेच हरियाणातील उचाना पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही कारवाई पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0