•अमराठी मोर्चा योग्य, मराठी मोर्चा संशयास्पद?
मीरा-भाईंदर | मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने घेतलेल्या मोर्च्याच्या निर्णयाला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला असतानाच, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेलं विधान नव्या वादाला तोंड फोडणारं ठरत आहे.
“मनसेच्या मोर्चामागे काही इतर राजकीय हेतू असू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली असावी,” असं विधान आमदार मेहता यांनी केलं आहे. मात्र, याच मेहतांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांनी काढलेल्या मोर्चाला खुलेआम पाठिंबा दिला होता, यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
“अमराठी हेतू स्पष्ट, मराठी आंदोलन गोंधळात?”
मेहता म्हणाले, “परप्रांतीयांनी सभागृहात मोर्चा घेतला. त्यांनी कुठलीही असभ्यता दाखवली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट होता – त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याविरोधात कारवाई व्हावी. मात्र, मनसे व मराठी एकीकरण समितीचं आंदोलन गोंधळाचं वाटतंय. ते भाजपा कार्यालयावर मोर्चा नेणार होते. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर आले असते तर कायदा-सुव्यवस्थेचा धोका निर्माण झाला असता.”
“मेहता यांची भाषा मराठी जनतेचा अवमान?”
मेहता यांच्या या विधानावर राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“परप्रांतीय मोर्चा शांत आणि योग्य ठरवणं, तर मराठी मोर्च्यावर संशय घेणं म्हणजे दुजाभावाचा कळस आहे,” असा आरोप अनेकांनी केला आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे की, “मोर्चा कोण घालतंय, हे महत्त्वाचं की मुद्दा काय आहे, हे?”
मेहतांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्येही अंतर्गत अस्वस्थता वाढली असल्याचं बोललं जात आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…