Nandurbar News : आदिवासी तरुणाच्या मृत्यूवरून नंदूरबार पेटले; आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलिसांचा लाठीमार

Nandurbar Latest News : वाहनांची तोडफोड, दगडफेक;20 हजार आंदोलक रस्त्यावर, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला
नंदूरबार :- एका आदिवासी तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नंदूरबारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज अनेक आदिवासी संघटना आणि हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले. सुरुवातीला शांत असलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
आंदोलनाला हिंसक वळण
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीत आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी 20 ते 22 हजार आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली आणि काही प्रमाणात दगडफेकही केली.
या हिंसक घटनेनंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलीस आणि आंदोलक जखमी
या संघर्षात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांसोबतच काही आंदोलकांनाही मार लागल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.सध्या नंदूरबार शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले जात असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात


