Nandurbar Crime News : नंदुरबारच्या लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याला अटक, प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजारांची लाच
•Nandurbar Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई ; नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना 50 हजाराचे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
नंदुरबार :- नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून कारवाई करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश सुरेश चौधरी (50 वर्ष) यांना 50 हजाराची लाच स्वीकारताना नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याला अटक केली आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करायचे होते. परंतु या परिसरात 75 मीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळा बंद पडलेले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने FL 3 परवाना देण्याकरिता शाळेकडून न हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे असे सांगितले होते.
परंतु जिल्हा परिषदेची शाळा ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी अशरफ भाई माजिद भाई लखानी अल्प संख्यांक विकास भाऊ उद्देशीय संस्था नवापूर या संस्थेने अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय आणि नवापूर शाळेचे आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामाचे मिळून 50 हजार रुपयाची मागणी केली होती. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15 मे 2024 रोजी पंच साक्षीदार सक्षम जिल्हा कार्यालयातील दलात पन्नास हजाराची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना रंगेहाथ पकडले असून चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.