क्राईम न्यूज

नांदेड हादरले! राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाचे दिवसाढवळ्या अपहरण; बेदम मारहाणीनंतर सुटका

Nanded Breaking News :आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर गंभीर आरोप; 7 आरोपींना अटक केल्याने खळबळ

नांदेड | नांदेड शहरात सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, घोगरे पाटील यांनी थेट महायुतीतील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर सूत्रधार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्रे फिरवून 7 संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. Nanded Attack News

नेमकी घटना काय?

सोमवारी सकाळी 11.30 ते 12.00 च्या सुमारास जीवन घोगरे पाटील हे सिडको परिसरातून त्यांच्या गाडीने कामाला जात होते. यावेळी एका महिंद्रा स्कॉर्पिओने त्यांची गाडी अडवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, 3-4 जणांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेऊन स्कॉर्पिओमध्ये बसवले आणि पळ काढला. त्यांना अज्ञात स्थळी नेऊन बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवल्याने त्यांची मुसलमानवाडी परिसरातून सुटका करण्यात आली.

‘चिखलीकरांच्या नादी लागू नकोस’; धमकीचा दावा

सुटकेनंतर पत्रकारांशी बोलताना जीवन घोगरे यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “अपहरणकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली आणि ‘आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस’ अशी धमकी दिली. या हल्ल्यामागे प्रताप पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा हात आहे.” 2 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून आणि राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडवल्याचा दावा त्यांनी केला आहे.

चिखलीकरांनी आरोप फेटाळले

मुलाला मदत केल्याचा दावा
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले,”जीवन घोगरे यांचा मुलगा दिग्विजय याचा मला फोन आला होता. त्याने वडिलांचे अपहरण झाल्याचे सांगताच मी स्वतः पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून चौकशीची विनंती केली. ज्याच्या मुलाला मी संकटसमयी मदत केली, तोच व्यक्ती आता माझ्यावर आरोप करत आहे हे दुर्दैवी आहे.”
चिखलीकर यांनी पुढे सांगितले की, घोगरे पाटील यांचे मार्केटमध्ये अनेकांशी आर्थिक व्यवहार आहेत आणि त्या वादातून हा प्रकार घडला असावा. सध्या फिरत असलेल्या ऑडिओ क्लिप्समधून सत्य समोर येईलच.

पोलिस तपासात काय समोर आले?

नांदेड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि घोगरे यांच्या तक्रारीवरून 7 जणांना अटक केली आहे. हा प्रकार वैयक्तिक वादातून होता की राजकीय हेतूने, याचा तपास पोलीस करत आहेत. दोन्ही नेते एकाच महायुतीचे भाग असताना झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago