क्राईम न्यूज

Nanded Crime News : सत्तेसाठी रक्ताचे नाते कलंकित! नांदेडमध्ये तिसऱ्या अपत्यामुळे निवडणूक लढवण्यास अडचण; बापाने पोटच्या लेकीला कालव्यात ढकलून संपवले

Nanded Latest Crime News : सरपंचाच्या मदतीने रचला हत्येचा कट; मुलीला दत्तक देण्याचा प्रयत्न फसला आणि बापाने उचलले टोकाचे पाऊल

नांदेड | सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक हृदयद्रावक आणि संतापजनक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पंचायत निवडणूक लढवण्यासाठी ‘दोन अपत्य’ असणे अनिवार्य असल्याने, अडसर ठरणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलीची बापानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात गावकऱ्यांचे रक्षण करणाऱ्या सरपंचानेच हत्येचा कट रचण्यास मदत केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. Nanded Breaking News

नेमके प्रकरण काय?

नांदेड जिल्ह्यातील केरुर येथील रहिवासी कोंडामंगली पांडुरंग यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये होती. आगामी पंचायत निवडणूक लढवण्याची पांडुरंग यांची प्रबळ इच्छा होती, मात्र शासनाच्या ‘दोन अपत्य’ नियमानुसार तीन मुले असताना त्यांना निवडणूक लढवणे शक्य नव्हते. या नियमातून पळवाट काढण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलीला, प्राचीला आयुष्यातून संपवण्याचा राक्षसी निर्णय घेतला.

आधी दत्तक देण्याचा प्रयत्न, मग हत्या

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पांडुरंग यांनी सुरुवातीला मुलीला कोणाला तरी दत्तक देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कागदोपत्री त्यांची दोनच मुले दिसतील. मात्र, मुलीची अधिकृत जन्म नोंदणी असल्याने कायदेशीर प्रक्रियेत हा प्रयत्न फसला. अखेर दुसरा कोणताही मार्ग न दिसल्याने त्यांनी मुलीला संपवण्याचा कट रचला. यामध्ये गावाचे सरपंच गणेश रामचंद्र शिंदे यांनीही त्यांना साथ दिली.

तेलंगणात नेऊन कालव्यात ढकलले
पांडुरंग यांनी मुलगी प्राची हिला तेलंगणा राज्यातील निजामनगर येथील एका कालव्याजवळ नेले आणि तिथे तिला पाण्यात ढकलून दिले. काही दिवसांनंतर कालव्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले.

अखेर पाप फुटले; आरोपींना बेड्या

पोलिसांनी चार दिवसांच्या तपासाअंती मुलीच्या आई आणि नातेवाईकांशी संपर्क साधून तिची ओळख पटवली. यानंतर पांडुरंग यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सत्तेसाठी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी वडील पांडुरंग आणि कट रचण्यात मदत करणारा सरपंच गणेश शिंदे या दोघांनाही अटक केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago