मुंबई
Trending

Parth Pawar : पार्थ पवारांवर 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप!

Ambadas Danve On Parth Pawar : ‘स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये, व्यवहार केवळ 27 दिवसांत’: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा गंभीर दावा

पुणे :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी गंभीर जमीन घोटाळ्याचा आरोप केला आहे. दानवे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे हा धक्कादायक दावा केला आहे.

नेमका आरोप काय आहे?

अंबादास दानवे यांनी आरोप केला की, पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ (Amedia) नावाच्या कंपनीने सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेली जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात अनेक गंभीर अनियमितता आहेत:

यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजले गेले.

महत्वाचे म्हणजे, उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली.

संपूर्ण व्यवहार केवळ 27 दिवसांत पूर्ण करण्यात आला.

एक लाखाचे भांडवल, 1800 कोटींची जमीन?

दानवे यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीच्या भांडवलावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दानवे म्हणाले, “उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची ‘अमेडिया’ ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावा.”

‘आयटी पार्क’ उभारण्याची तयारी: दानवे यांच्या मते, या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली आहे. “एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतनाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल,” असा खोचक सवालही अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

मेवाभाऊंच्या राज्यात…

1800 कोटींची जमीन
300 कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये!

उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.

गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500!

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0