Shinde- Thackeray: शिंदे-ठाकरे एकाच फ्रेममध्ये!शिंदे-ठाकरे ‘समोरासमोर’; एकमेकांकडे पाहणेही टाळले!

Shinde Thackeray Latest News : अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी सभागृहात दोघे नेते
मुंबई :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यकाळाचा निरोप समारंभ आज विधानभवनात पार पडला. यानंतर झालेल्या फोटोसेशनदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर समोरासमोर आले. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र दिसले. मात्र, दोघांनी एकमेकांकडे पाहणेही टाळल्याचे पाहायला मिळाले. Maharashtra Political Latest News
उद्धव ठाकरे मंचावर येताच उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली जागा सोडून त्यांना मार्ग दिला. याचवेळी शेजारी उभे असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंकडे उद्धव ठाकरे पाहिलेही नाहीत. नीलम गोऱ्ह यांनी त्यांना शेजारी बसण्यास सांगितले, मात्र ठाकरे यांनी त्या जागी बसण्याऐवजी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला बसणे पसंत केले.
या क्षणाचे राजकीय महत्त्व अधोरेखित होत असून, गेल्या दोन वर्षांच्या संघर्षानंतर ठाकरे-शिंदे यांच्यातील तणाव पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आला.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. “मी सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही, तो माझ्या वडिलांचे आणि आजोबांचे कर्तृत्व आहे. हे आयत्या ताटावर बसलेले लोक आहेत. त्यांनी खाल्लेल्या ताटातच घाण केली,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
“भाजपमध्ये आरोप असलेल्या लोकांना पक्षात घेऊन, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जात आहेत. उद्या दाऊदही भाजपमध्ये गेला तर त्यालाही माफ केले जाईल,” असेही ठाकरे म्हणाले. त्यांनी ‘सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या’ व्यक्तीलाही पक्षात घेतल्याचा आरोप करत भाजपवर निशाणा साधला.
अंबादास दानवे यांच्या “मी पुन्हा येईन” या विधानावरही ठाकरे म्हणाले, “ते मीच त्यांना सांगितलं बोलायला. कारण विरोधी पक्ष कायमच असतो. सत्ता कोणाच्या बापाची नाही!”


