Nana Patole : महाराष्ट्राची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे
- नाना पटोले यांचा पनवेल मधील प्रचार सभेत घणाघात
- रमेश कीर यांच्या प्रचार सभेत धडाडल्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या तोफा
पनवेल | जितीन शेट्टी : महाराष्ट्राची वाताहात करणाऱ्या व्यवस्थेला संपवण्याचा अधिकार पदवीधरांना आहे. त्या अधिकाराचा त्यांनी या निवडणुकीत परिपूर्ण वापर करावा असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले Nana Patole यांनी पनवेल येथील प्रचार सभेत भाजपा आणि मित्र पक्षांवर घणाघाती प्रहार केले. महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मंगळवार दिनांक १८ जून रोजी झालेल्या या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, शिवसेना ( उ बा ठा)चे कोकण समन्वयक विजय कदम,पनवेल शहर जिल्हा निरीक्षक माजी आमदार हुस्न बानू खलिफे,काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार नसीम खान,उमेदवार रमेश किर आदींची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पनवेल उरण महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील यांनी प्रास्ताविकपर भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार Sharad Pawar Group पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, विजय कदम,भाई जयंत पाटील यांनी आपली मनोगते सादर केली.
रमेश कीर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व मुद्देसूद भाषणांमध्ये गेली बारा वर्षे कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये आमदाराचे अस्तित्व जाणवत नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले की विद्यमान आमदार यांनी प्रसिद्ध केलेल्या २० पानी पत्रकात पदवीधर आमदाराने करावयाचे एकही काम समाविष्ट नाही. त्यांनी विद्यमान आमदारांना आव्हान दिले की बारा वर्षात बारा सोडा,फक्त तीन केलेली कामे दाखवा. रोजगार निर्मितीवर भर, जुनी पेन्शन योजना लागू करणे यासाठी आमचा अग्रक्रम असेल तसेच जिल्हा उद्योग केंद्रांना भेटी देऊन उपलब्ध रोजगारांची माहिती घेऊन ती बेरोजगारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सातत्याने करू. मोजकेच मुद्दे घेऊन कमी बोलून जास्त काम करण्यावर आमचा भर असेल. Congress Leader Nana Patole Latest News
सभेच्या अध्यक्षस्थानी असणारे नानाभाऊ पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील असंविधानिक सरकार यांचा खरपूस समाचार घेताना सांगितले की सध्या बेरोजगारांचे राज्य अशी आपली ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात केंद्रातील सरकाराने महाराष्ट्राची वाताहत लावली आहे. आज १७ हजार पोलिसांची भरती होत असली तरी त्यासाठी १७ लाख अर्ज आले आहेत यावरून बेरोजगारीची कल्पना येते. ही पोलीस भरती देखील शाश्वत नाही, उद्या कदाचित पेपर फुटू शकतो आणि भरती प्रक्रिया थांबू शकते. आज इथे एखादा प्रकल्प येत असेल तर त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची अगोदरच पडताळणी करून त्या स्वरूप त्या प्रकल्पामध्ये रोजगार निर्माण करून देण्याचे काम आम्हाला उभे करायचे होते. परंतु कोरोना कालखंड आणि पक्षांची तोड फोड करून बनविलेले असंविधानिक सरकार हे आपल्या समोरील अडथळा ठरले. विधान परिषदेच्या या निवडणुकांच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याची सुवर्णसंधी आपल्याला चालून आलेली आहे. आज महागडी वीज तुम्हा आम्हाला वापरावी लागत आहे. उपभोक्त्यांना सतावणारी प्रीपेड रिचार्ज मीटर आपल्या डोक्यावर आणून मारली जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमची लढाई या सगळ्याच्या विरोधात आहे. कारण अशा वातावरणामुळेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे अन्य राज्यात जात असल्यामुळे पदवीधरांसह सगळ्यांनाच बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. आज गोदी मीडियाला हाताशी धरून नरेटिव पसरवण्याचे धंदे सुरू आहेत. माझे पाय धुण्याच्या बातमीवरून विपर्यास करून पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थी करत असलेले आंदोलन दडपण्याचा कारभार सुरू आहे. या गोदी मीडियाला माझ्या पायाला लागलेला चिखल दिसला पण ई डी आणि सीबीआय सारख्या चिखलांनी बरबाटलेला महाराष्ट्र यांना दिसत नाही, ही खरी शोकांतिका आहे. कोकणात रमेश कीर यांचा तर अन्य तीन ठिकाणी महाविकास आघाडी उमेदवाराचाच दणदणीत विजय होणार.
माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन दादा पाटील, जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू,सतीश पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती नारायण शेठ घरत,शिरीष बुटाला,पराग मोहिते युवासेना जिल्हाध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेस कमिटी महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, शेकापूर पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,समाजवादी पार्टी चे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक,मल्लिनाथ गायकवाड,अवचित राऊत युवासेना महाराष्ट्र सहसचिव आदींचे सह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. Congress Leader Nana Patole Latest News