Nana Patole Latest News : विधानसभा निवडणुकीतील अनियमिततांवरून काँग्रेस आक्रमक
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित अनियमिततांवरून काँग्रेसने थेट राष्ट्रपतींच्या दरबारात चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, त्यांनी निवडणुकीदरम्यान “सत्तेचा गैरवापर” झाला असल्याचा ठपका ठेवत, सध्याचे राज्य सरकार बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे.
नाना पटोले यांनी लिहिलेले पत्र
भारतीय संविधानात नमूद केलेल्या लोकशाही मूल्यांचे, निवडणुकीचे पावित्र्य आणि सामान्य नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी मी तुम्हाला हे पत्र मोठ्या चिंतेने आणि अपेक्षेने लिहित आहे.
अलीकडेच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आणि तथ्यात्मक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की राज्यातील 82 विधानसभा मतदारसंघांमधील 12,000 हून अधिक मतदान केंद्रांवर प्रक्रियात्मक अनियमितता झाल्या आहेत, ज्यामुळे कोट्यवधी मतांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हा प्रश्न केवळ राहुल गांधींचा नाही तर महाराष्ट्रातील गाव, शहरे आणि आदिवासी भागात राहणाऱ्या कोट्यवधी मतदारांचा आवाज आहे. सामान्य जनता विचारत आहे की, निवडणुका निष्पक्ष झाल्या का? त्यांच्या मतांचा गैरवापर झाला का? आणि लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचे अपहरण झाले आहे का?
आदरणीय महोदया, जर निवडणुकीत हेराफेरी झाली असेल तर ती केवळ प्रशासकीय चूक नाही तर संविधानाच्या भावनेवर आणि सामान्य मतदाराच्या हक्कांवर हल्ला आहे. ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि याची निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करणे ही काळाची गरज आहे.
महोदया, तुम्ही या राष्ट्राच्या सर्वोच्च संवैधानिक प्रमुख आहात. आम्हाला आशा आहे की, तुम्ही संविधानाची प्रतिष्ठा आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी निर्णायक पावले उचलाल. देशाचे भविष्य, लोकशाहीची प्रतिष्ठा आणि कोट्यवधी मतदारांचा विश्वास आज तुमच्याकडे पाहत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…