मुंबई

Nana Patole : “मोदी तुमचा बाप असेल…” विधानावरून गोंधळ; नाना पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित

Nana Patole Suspended for Ond Day: कृषीमंत्री कोकाटे व लोणीकर यांच्या विधानांवरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरले. Nana Patole Suspended for Ond Day मात्र, सभागृहात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवरून अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं.

गोंधळाच्या दरम्यान खुद्द नाना पटोले अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन संतापाने बोलू लागले. “मोदी तुमचा बाप असेल, पण शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी रोष व्यक्त केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माफीची मागणी केली. पण नाना पटोले माघार घेण्याच्या भूमिकेत नव्हते. यामुळे अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केल्याचे जाहीर केले.

यानंतर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू ठेवली – “शेतकऱ्यांची माफी मागा!” या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत, विरोधकांनी दिवसभरासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

यानंतर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू ठेवली – “शेतकऱ्यांची माफी मागा!” या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. सरकारकडून शेतकऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप करत, विरोधकांनी दिवसभरासाठी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

“शेतकऱ्यांच्या अपमानाविरोधात आवाज उठवल्यामुळे जर कुणाला निलंबित केलं जात असेल, तर तो महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts