Nana Patole Accident : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले
•Nana Patole Car Hit by A Truck महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला आहे. नाना पटोले निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.
भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. निवडणूक प्रचार आटोपून परतणाऱ्या नाना पटोले यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिली. भंडारा जिल्ह्यातील भिलवाडा भागात हा अपघात झाला. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांच्या तक्रारीवरून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. Nana Patole Accident
प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली
अतुल लोंढे यांनी एक्स ट्विटरवर लिहिले, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत. Nana Patole Accident