Nalsopra Crime News : चार्जिंगला लावलेले मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; नालासोपारा पोलिसांना यश आले आहे
Nalasopra Police Arrested Mobile Stoller Criminal : नालासोपाऱ्यात मोबाईल फोन चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 7 गुन्ह्याचे उकल
नालासोपारा :- चार्जिंगला लावलेले मोबाईल फोन पहाटेच्या दरम्यान चोरी करणाऱ्या एका आरोपीला नालासोपारा पोलिसांनी अटक Nalasopra Police Station केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी एकूण 07 गुन्ह्यांची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले सर्व मोबाईल जप्त केले आहे. Nalasopra Crime News
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल फोन चोरीचे तसेच घर फोडीचे अनेक गुन्ह्याच्या संख्येत वाढ होत आहे. या वाढलेल्या चोरीच्या घटनेचा आळा घालण्याकरिता वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. नालासोपारा येथील हनुमान नगर परिसरात असलेल्या शिवम बिल्डिंगच्या मैत्री पार्क मध्ये झालेल्या चोरी मधील फिर्यादी यांच्या घराचे पहाटे स्लाइडिंग उघडून घरात सर्व झोपलेले असताना घरातील चार्जिंगला ठेवलेले दोन मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ),331(4) गुन्हा दाखल होता. Nalasopra Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी पाहणी करून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार यांचा गुन्ह्याचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि सीसीटीव्ही च्या मदतीने एका आरोपीला हनुमान नगर परिसरातून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद इजहार मोहम्मद अस्लम शेख, (23 वर्ष, हनुमाननगर, नालासोपारा) आहे. आरोपीचे 7 गुन्ह्याचे उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे.सहाय्यक फौजदार हिरालाल निंकूभ, पोलीस हवालदार किशोर धनू , पोलीस नाईक अमोल तटकरे नालासोपारा पोलिस ठाणे मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय हे करित आहेत. Nalasopra Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3, राजेंद्र लगारे, सहायक पोलीस आयुक्त नालासोपारा यांचे मार्गदर्शनाखाली विजयसिंह बागल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, सहाय्यक फौजदार हिरालाल निकुंभ, पोलीस हवालदार किशोर धनु, प्रशांत साळुंके, पोलीस नाईक अमोल तटकरे, पोलीस अंमलदार राजेश नाटुलकर, बाबासाहेब बनसोडे, प्रताप शिंदे यांनी केलेली आहे. Nalasopra Crime News