मुंबई

Nallasopara Cyber Fraud Awareness : सायबर गुन्हेगारीवर ‘पोलीस शिकवणी’!

•U.S. Ostwal English Academy येथे सायबर जनजागृती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नालासोपारा (पूर्व) :- “क्लिक करा, पण सावध राहा!” असा मोलाचा सल्ला देत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित सायबर जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील धोक्यांची जाणीव करून देण्यात आली.2 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता U.S. Ostwal English Academy, ओसवाल नगरी, नालासोपारा पूर्व येथे झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी विद्यार्थ्यांसमोर सायबर गुन्ह्यांची वास्तविकता उलगडून दाखवली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चुकीचा वापर, फसवणूक करणारे लिंक्स, बँकिंग फ्रॉड, बनावट प्रोफाईल्स यांची उदाहरणांसह सखोल माहिती दिली.

“केवळ ‘Accept’ वर क्लिक करताना विचार करा – कुणालाही ‘Yes’ म्हणणं हीच सायबर गुन्ह्यांची सुरुवात असते,”पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांचे वक्तव्य कार्यक्रमात गारुड निर्माण करणारे ठरले.

कार्यक्रमात केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर 10 शिक्षकवृंदांनाही इंटरनेट व्यवहारांतील सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. सोशल मीडिया युजर्सनी कसे वागावे, कोणती माहिती शेअर करु नये, ओळखीच्या नावाने येणाऱ्या लिंक्सवर कसे सावध राहावे – यावर त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना सायबर गुन्हे व त्यावरील उपाययोजनांची माहिती असलेली पत्रके वाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम शिक्षणाबरोबर ‘सुरक्षेचा मूलमंत्र’ शिकवणारा ठरला, अशी प्रतिक्रिया दिली.

प्रा. अमित ठक्कर यांच्यासह शाळेतील इतर शिक्षकांनी पोलीस विभागाच्या पुढाकाराचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच डिजिटल सजगतेची शिकवण ही काळाची गरज आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0