Nallasopara Crime News : तुळीज गुन्हे शाखाची कारवाई ; शुल्लक कारणावरून चाकूने वार करणारे दोन आरोपी जेरबंद
तुळीज गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकु पोटात भोसकून प्राणघातक हल्ला करून फरार अज्ञात आरोपींना 24 तासांचे आत जेरबंद
नालासोपारा :- तुळीज गुन्हे शाखेने शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन आरोपींनी एका व्यक्तीवर चाकूने वार करत जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे.ओव्हरब्रिजखाली भाजी मार्केट येथुन डाव्या बाजुच्या जिन्यावर नालासोपारा पूर्व या ठिकाणी फिर्यादी नामे गणेश महेश जैस्वाल (30 वर्षे) डिव्हाईन स्कुल जवळ काजुपाडा तुळींज रोड नालासोपारा पूर्व हे तुळींज ब्रिजखालील जिन्याने चढून वरती जात असताना रस्त्यामध्ये बसल्याच्या कारणावरून वाद होवुन 02 अनोळखी आरोपी यांनी चाकुने वार करून जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केलेवरून फिर्यादी यांनी दिलेले तक्रारीवरुन आरोपी यांचेविरूद्ध भादविस कलम 307,323,504,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी आरोपीत यांचा शोध घेवुन त्यांना तात्काळ अटक करणेबाबत आदेशित केले होते. गुन्ह्यातील आरोपी यांचेबाबत फिर्यादी तसेच साक्षीदार यांना पूर्ण नाव व पत्ता माहित नव्हता. तसेच आरोपी हे मोबाईल फोनचा वापर करित नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने, आरोपीत याचा शोध घेत असताना अडचणी येत होत्या. आरोपी यास अंमली पदार्थाचे सेवन करण्याची सवय असल्याने व तो नालासोपारा स्टेशन जवळील डंपिंग ग्राउंड तसेच झाडाझुडुपामध्ये राहत असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने आरोपीचा सदर परिसरात शोध घेवून आरोपी क्र. 01 यास ताब्यात घेतले. तसेच आरोपी क्र. 02 हा परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना, त्यास त्याचे राहते परिसरातुन ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी यांना गुन्हा दाखल झाल्यापासून अविरतपणे तपास करून, आरोपी यांचेबाबत काही एक माहिती नसताना तसेच आरोपी हे मोबाईल फोनचा वापर करित नसल्याने, ते ज्या ठिकाणी वास्तव्य करतात त्या संभाव्य ठिकांणांची माहिती प्राप्त करून नाव पत्ता निष्पन्न करून 24 तासांचे आत आरोपीत नामे, 1) राहुलकुमार शिवप्रकाश दुबे उर्फ पंडित (रा. १० फिट रोड प्रगतीनगर नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर. ) 2) दिव्यांशु उर्फ टकला सुरेश यादव (19 वर्षे) (रा. कृष्मा चाळ वैतीचाडी आचोळे नालासोपारा पूर्व ता. वसई जि. पालघर) ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, दोन्ही आरोपी यांना 17 एप्रिल 2024 रोजी अटक केली आहे.
आरोपी क्र. 01 हा सराईत अपराधी असुन त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत
1) माणिकपुर पोलीस ठाणे भादवि कलम 454,457,380 प्रमाणे.
2) माणिकपुर पोलीस ठाणे भादवि कलम 454,457,380 प्रमाणे.
3) वसई पोलीस ठाणे भादवि कलम 392,34 प्रमाणे.
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, उमेश माने- पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, तुळींज पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुधिर चव्हाण, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस उपनिरीक्षक बि.एस. बांदल, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरता, केंद्रे, पोलीस अंमलदार राहुल कदम यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधवर हे करीत आहेत.