Nallasopara Crime News : नवघर पोलीस ठाणेची कामगिरी ; खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीस पश्चिम बंगाल येथुन अटक
•पैशाच्या वादातून झाला होता खुन
नालासोपारा :- साडेचार हजार रुपये वादातून मित्राला तिथून पळवून नवघर पोलिसांनी आरोपीला पश्चिम बंगाल येथे अटक करण्यात आली आहे.10 जानेवारी 2024 रोजी दारु पिऊन पडलेल्या व डोक्याला जखम असलेला मोहम्मद मुबारक अली याला उपचाराकामी के.ई.एम. रुग्णालयात परेल येथे दाखल केले होते व तेथे त्याचेवर दवाउपचार चालू असताना मोहम्मद मुबारक अली हा 14 जानेवारी 2024 रोजी डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले होते. नवघर पोलीस ठाणेमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करुन चौकशी सुरु केली होती. Nallasopara Crime News
पोलिसांकडून आरोपीचा शोध
अकस्मात मृत्युमधील मयत याचे मृत्युबाबत संशयाचा प्रकार असल्याने वरिष्ठांचे आदेशाने अकस्मात मृत्युबाबत तपास चालु असतांना मोहम्मद मुबारक अली व त्याचा साथीदार करीमउल्ला खान यांचेमध्ये भांडण झाले असल्याचे व करीमउल्ला खान हा सदर ठिकाणाहून पळून गेला असल्याचे समजले होते. वैदयकीय अहवालावुन व अकस्मात मृत्युच्या केलेल्या चौकशीतुन करीमउल्ला खान याचे विरोधात नवघर पोलीस ठाणे भा.द.वि.स कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. Nallasopara Crime News
गुन्हा गंभीर असल्याने गुन्हयाची माहिती वरिष्ठांना देवुन त्यांचा मार्गदर्शनाप्रमाणे नमूद गुन्हयाचा तपास सुरु केला सदर गुन्हयातील आरोपीत नामे करीमउल्ला खान हा वारंवार सुलतानगंज, अलीपुर- पश्चिम बंगाल, नोएडा-दिल्ली येथे त्याचे अस्तित्व लपवित होता. नवघर पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करुन आरोपीत नामे करीमउल्ला खान यास सुलतानगंज, पश्चिम बंगाल येथुन 09 मार्च 2024 रोजी नवघर पोलीस ठाणेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. नमुद आरोपीत नामें करीमउल्ला खान व मयत नामे मोहम्मद मुबारक अली यांच्यामध्ये 4 हजार 500 रुपयांवरुन वाद होवुन दोघांमध्ये भांडण झाले होवुन भांडणात मोहम्मद मुबारक अली यास मारहाण केलेबाबत कबुली दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कांबळे (गुन्हे) करत आहे. Nallasopara Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक अशोक कांबळे (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पालवे, विशाल धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार संतोष पाटील, पोलीस हवालदार भुषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, पोलीस शिपाई ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे. Nallasopara Crime News