Nallasopara Crime News : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपींकडून 6 गुन्हयांची उकल

•नालासोपाराच्या शिर्डी नगर परिसरात राहणारे स्नेहा रघुनाथ म्हात्रे यांच्या राहते घरी 13 फेब्रुवारीला मोबाईल चोरून नेला होता
नालासोपारा :- मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपीला अटक करून 6 गुन्हयांची उकल करण्यात आचोळे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले 25 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली आहे.
नालासोपाराच्या बाळकृष्ण चाळ येथील साईबाबा मंदिराच्या जवळ असलेल्या शिर्डी नगर परिसरात व राहणारे स्नेहा रघुनाथ म्हात्रे यांचे राहते घरी 13 फेब्रुवारी रोजी मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.पोलीस आयुक्तालयात सतत होणा-या मोबाईल चोरींचे प्रमाण वाढत असल्याने मोबाईल चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी आदेश केले होते. पोलिसांना मिळालेल्या बातमीनुसार व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे आचोळे मोबाईल चोरीच्या गुन्हयांतील आरोपी हे भिम डोंगडी गाळानगर, परीसरात संशयितरित्या फिरत असल्याची बातमी मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संदीप श्रीराम गुप्ता (22 वय) आणि साईनाथ प्रकाश राठोड (18 वय) ताब्यात घेतले.आरोपीचा गुन्हातील सहभाग निष्प्पन्न झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर आयुक्तालयातील चार पोलीस ठाण्यात संदीप श्रीराम गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून,साईनाथ प्रकाश राठोड याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा तिसरा साथीदार असलेला राजेंद्र गंगाप्रसाद जैसवाल (39 वय) यालाही ताब्यात घेतल्या असून आरोपींकडून पोलिसांनी एक लाख 25 हजार रुपयांचे विविध कंपनीचे 25 मोबाईल हस्तगत केले आहे.
पोलीस पथक
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-2 वसई,उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुजितकुमार पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशाल खैरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आचोळे पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईगडे, शंकर शिंदे, निखील चव्हाण, पोलीस अंमलदार विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर, लोकेश कुवर, गोविंद गुट्टे, महिला पोलीस अंमलदार जनाबाई हिवाळे यांनी यशस्वी रित्या केलेली आहे.