Nalasopra Tadipar News : शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे
नालासोपारा :- राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. Nalasopra Tadipar News राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -3 कार्यक्षेत्रातील नालासोपारा पोलीस ठाण्याच्या Nalasopra Police Station हद्दीतून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे आहे. फिरोज कासिम पौजी (वय 52 वर्ष रा.वाझा मोहल्ला, मशिदी जवळ, सोपारागांव नालासोपारा पश्चिम ता. वसई, जि. पालघर) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज पौजी याच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात सन 2010 ते 2024 या कालावधीत मारहाण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धमकी देऊन दहशत निर्माण करणे, गर्दी करून मारामारी करणे, गंभीर मारामारी करणे, प्राण्यांना कुरतेने वागविणे, बेकायदेशीर जनावरांचे वाहतूक करणे तसेच कत्तल करणे असे जवळपास आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3, विरार जयवंत बजबळे यांनी आरोपीला हद्दपारचे आदेश दिले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…