Nalasopra Sex Racket : नालासोपाऱ्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; वेश्यादलाल अटकेत,2 तरुणींची सुटका
Nalasopra Sex Racket Busted By Nalasopra Police : नालासोपाऱ्यातील एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.
नालासोपारा :- मुंबईनजवळील असणाऱ्या वसईतील दिवाणमान डिजी रोड जवळ, वसई पश्चिम या ठिकाणी असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Nalasopra Sex Racket Busted याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या दोन तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका वेश्याव्यवसाय दलाल हिला ताब्यात घेतलं आहे.नालासोपाऱ्यातील अनैतिक मानवी प्रतिबंधक पोलिसांच्या पथकाने कारवाई करून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दिवाणमान डिजी रोड जवळ वसई पश्चिम या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. महिला व्हाट्सअप च्या माध्यमातून ग्राहकांना वेश्याव्यवसाय करिता मुली पूर्वत असल्याचे माहिती मिळाली होती. तसेच त्या बदल्यात ती महिला कमिशन घेत असल्याचे पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून दिवाणमान डिजी रोड जवळ वसई पश्चिम येथे छापा टाकला तेव्हा पोलिसांनी दोन वेश्या कामासाठी आलेल्या तरुणींची सुटका केली. तसेच, पोलिसांनी बोगस ग्राहकांमार्फत दिलेल्या वेश्यादलाल 22 हजार रुपये रोख रक्कम स्वीकारताना अटक केली आहे.निलोफर अब्दुल अझीज (वय 58) वेश्या दलाला चे नाव असून तिच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(2) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार व पोलीस हवालदार महेंद्र शेट्ये, रोशन किणी, श्याम शिंदे, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, सुप्रिया तिवले, पोलीस हवालदार सुनिल पागी, महिला पोलीस शिपाई काजल पाटील सर्व काढायची मानवी प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.