क्राईम न्यूजमुंबई
Trending

Nalasopra Sex Racket : नालासोपाऱ्यात लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; दोन महिलांची सुटका

Nalasopra Police Busted Sex Racket : लॉजवर कारवाई, वेश्या दलाला पोलिसांकडून अटक, बोगस ग्राहकाकडून लागला छडा

नालासोपारा :- वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. Nalasopra Police Busted Sex Racket तसेच एकाला अटक केली आहे.तुळींज पोलीस ठाण्याच्या Tulij Police Station हद्दीत लॉजिंग ॲण्ड बोर्डिंग एका पुरुषाकडून वेश्याव्यवसाय केल्या जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सौरभ पवार यांनी कारवाई करत या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.

मोजाम अली देलबहार शेख (वय 47, रा. नालासोपारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीवर यापूर्वीही माणिकपूर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचं दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील लाॅज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी हे पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेलया रकमेतून स्वत:ची उपजिविका भागवित असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत पोलिसांनी बोगस ग्राहकांमार्फत आरोपींचा शोध घेऊन या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्या पीडित महिले कडून या कामाबाबत वेश्या दलाल साडेतीन हजार रुपये घ्यायचा आणि त्याच्या मोबदल्यात पाचशे रुपये त्या महिलांना देत असे अशी माहिती पोलिसांना आरोपीकडून देण्यात आली आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, सहाय्यक फौजदार उमेश गवई, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, महेंद्र शेट्ये,अमित चव्हाण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया तिवले, सुनिल पागी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांनी उत्कृष्ठरित्या केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0