Nalasopra Robbery Latest News : एसटी बस स्टॉप वर बसलेल्या प्रवाशाला जबर मारहाण, मोबाईल फोन, हातातील अंगठी, खिशातील दहा हजार रुपये, इअर कॉड चोरीला
नालासोपारा :- जबरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या Nalasopra Achole Crime Branch पोलिसांना यश मिळाल्याची आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांनी दिली आहे. नालासोपारा पूर्व येथे राहणारे कबीर विनय सत्येंद्र चौरसिया (28) यांना आचोळे क्रॉस रोड येथील एसटी बस स्टॉप जवळ बसलेले असताना तेथे दुचाकी वरून दोन अनोळखी व्यक्ती दगडाने मारहाण केली. मोबाईल, हातातील कडे, अंगठी, इअर कॉड, खिशातील दहा हजार रुपये हिसकावून घेतले. याप्रकरणी अचोळे पोलीस ठाण्यात Nalasopra Achole Police Station भारतीय न्याय संहिता 309(6),3(5) प्रमाणे 3 जानेवारी दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच घटनास्थळी गुन्हा उघडकीस आणणे एक कसोटी होती. परंतु वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या अनुशंगाने आचोळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मोहित ऊर्फ मयंक राजिव चौव्हाण, (वय 18 रा.अलकापुरी, नालासोपारा) करण किशोर दंतानी, (वय 28 रा.अलकापुरी, नालासोपारा) आणि लव ऊर्फ मोनु रमेश सरोज (वय 23, रा.एव्हरशाईन सिटी, वसई पूर्व) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेवुन फिर्यादी यांचेकडुन जबरी चोरी केलेला मोबाईल, हातातील कडे, हातातील आंगठी व रोख रक्कम असे 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डचे, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, उमेश माने-पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुजितकुमार पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आचोळे पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विशाल खैरे (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, पोलीस हवालदार दत्तात्रय दाईंगडे, शंकर शिंदे, पोलीस अंमलदार निखील चव्हाण, विनायक कचरे, अमोल सांगळे, मोहनदार बंडगर, मनोज पाईकराव, गोविंद गुट्टे, लोकेश कुवर, यांनी यशस्वी रित्या केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…