Nalasopra Robbery News : पंचकर्म उपचारासाठी आलेल्या व्यक्तीचे दागिने चोरणाऱ्या नोकऱ्याला 48 तासांत अटक

Nalasopra Robbery Case : चोरी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल ,रोख रक्कम, रोलेक्स घड्याळ असा सुमारे 17 लाख 05 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नालासोपारा :- पंचकर्म उपचारासाठी आलेल्या फिर्यादीने उपचारादरम्यान काढून ठेवले सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आयफोन, रोलेक्स घड्याळ चोरी करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी 48 तासांत जेरबंद केले आहे. Nalasopra Robbery News राकेश शिवशंकर पांडये,( वय 32, रा. जि. गया, राज्य-बिहार) याला मध्य प्रदेश राज्यातील खांडवा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, आयफोन, रोलेक्स घड्याळ असे एकूण 17 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदिप रामचंद्र गुप्ता, (वय 45 व, रा. खुशल हेरिटेज टॉवर, डिसक्वरी बिल्डिंग शेजारी, दत्त पाडा रोड, बोरिवली पूर्व) हे 25 फेब्रुवारी च्या दरम्यान सायंकाळीच्या सुमारास डॉ. सर्वेश्वर शर्मा यांच्या वेदस आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर, नालासोपारा येथे पंचकर्म उपचार घेण्याकरीता गेले होते. त्या ठिकाणी पंचकर्म उपचार घेत असताना त्यांनी त्यांचेकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, आयफोन मोबाईल व रोलेक्स कंपनीचे हातातील घड्याळ असे 17 लाख 05 हजार रुपये किंमतीचे सामान पंचकर्म सेंटरचे आतील रुममध्ये काढून ठेवलेले असताना त्यांचा केअर-टेकर राकेश पांडेय याने त्या वस्तू घेऊन तिथून पळ काढला. या संदर्भातील नालासोपारा पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयामध्ये फिर्यादी प्रदीप गुप्ता यांचे मोठ्या प्रमाणात दागीने चोरी झालेले असल्याने परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी हा त्याचे मुळ गावी रेल्वेने पळून जात असताना त्याला 28 फेब्रुवारी रोजी “खांडवा- मध्यप्रदेश” येथुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचे अंगझडती घेतली असता चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त, जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, विजय लगारे सहाय्यक आयुक्त नालासोपारा, विशाल वळवी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे, अमरसिंह पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस हवालदार प्रशांत साळुंके, पोलीस नाईक अमोल तटकरे, पोलीस शिपाई कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे,बाबा बनसोडे सोहेल शेख (पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-3 विरार) यांनी केलेली आहे.