Nalasopra Police Arrested Member Of Tirchi Gang From Tamil Nadu : नालासोपारा पोलिसांची कारवाई तिरची गैंग (तमिळनाडू) मधील आरोपीस अटक, आरोपींच्या विरोधात महाराष्ट्रात सहा गुन्हे, कर्नाटकात दहा गुन्हे तर तेलंगणामध्ये दोन गुन्हे दाखल
नालासोपारा :- नालासोपारातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. Nalasopra Car Robbery News गाडीची काच फोडून चोरट्याने वाहनामधील दोन लॅपटॉप आणि 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नालासोपारा पोलिसांच्या Nalasopra Police पथकाने आरोपीला सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने अटक केली असून आरोपी हा सराईत कार चोरीमध्ये गुन्हेगार असल्याचे आरोपीची चौकशी सुरू असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Nalasopra Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित विजय गडकरी (55 वय) अंबाडी क्रॉस रोड वसई येथे कोटक महिंद्रा बँकेत कामा निमित्त गेले असता त्यांनी कार बाहेर उभे केले असता कार ची कुणीतरी अज्ञात चोरट्याने काच फोडून, दोन लॅपटॉप आणि 27 हजारो रोकड चोरीला गेल्याची तक्रार नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 203(2),324(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पोलीस स्टेशनच्या Nalasopra Police Station कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढल्याने परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळावरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज पाहून अनोळखी चोरट्यांचा शोध सुरू केला. आरोपीं शोध घेत असताना नालासोपारा, वसई, बोरीवली व मुंबई परिसरातील सुमारे 250 सी.सी.टी.व्ही फुटेज कैमेरे पडताळण्यात आले. घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हयाचा तपास केला असता गुन्हयातील आरोपी शनमुगम अमरनाथन, (वय 38, रा. त्रिरुचीरापल्ली तामिळनाडु) हा असल्याचे निषन्न करून त्याला राहत्या घरातून 9 नोव्हेंबरला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन गुन्हयातील एच.पी. कंपनीचा 1 लॅपटॉप ,27 हजार रोख रक्कम असे एकूण 45 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता तिरची गैंग (तमिळनाडू) या टोळीतील आरोपी असून आरोपीच्या विरोधात एकूण कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात 12 गुन्हे तर मुंबई पोलिसांमध्ये 6 गुन्हे दाखल आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त,जयंत बजबळे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 विरार, विजय लगारे सहाय्यक आयुक्त नालासोपारा, विशाल वळवी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे, धनंजय शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, सहाय्यक फौजदार हिरालाल निकुंभ, पोलीस हवालदार प्रशांत साळूके, पोलीस अंमलदार अमोल तटकरे, पोलीस शिपाई कल्याण बाचकर, राजेश नादुलकर, प्रेम घोडेराव पोलीस शिपाई सोहेल शेख कार्यालय यांनी केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…