Nalasopra Murder News : अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस 24 तासाच्या आत अटक, ज्वेलर्स पाकीटाने उलगडले मृतदेहाचे रहस्य

Nalasopra Murder Arrested By Mandavi Police Station : कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, मुंडके धडापासून वेगळे करुन खून केला
नालासोपारा :- अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून तिचा खुन करुन नालासोपारा येथून आरोपीस मांडवी पोलिसांनी Mandavi Police Station अवघ्या 24 तासाच्या आत ताब्यात घेतले असून हरिष बरवराज हिप्परगी, (वय 49, रा, पश्चिम बंगाल) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी चे नाव आहे. तर उत्पला हरिश हिप्परगी, (वय 51 रा, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.या हत्येचा मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा कक्ष 3 चे Nalasopra Crime Branch Unit 3 पथक समांतर तपास करीत असताना अवघ्या 24 तासाच्या आत हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे उघड झाले असून, पतीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष 3 ला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश बरवराज हिप्परगी (वय 49) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर उत्पला हरीश हिप्परगी (वय 51) असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे. ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी असून आरोपी पती हा कर्नाटकचा आहे. एका हॉटेलमध्ये काम करत असताना या दोघांची ओळख झाली. 12 वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. मयत महिलेचा हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगा आहे.
हे दोघे प्रेमविवाहानंतर नालासोपारा पूर्वमधील रहेमत नगर येथे रुम भाड्याने घेऊन राहत होते.लग्नानंतर या दोघांमध्ये कौटुंबिक वादातून वारंवार वादविवाद होत होते. 13 मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगेत महिलेचं मुंडकं सापडलं होतं. दरम्यान, एका ज्वेलरी शॉपच्या पाकिटामुळे या हत्येचा उलगडा झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक जपोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, सागर सोनवणे, प्रविष्ण वानखेडे, गणेश यादव सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3 तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.