ठाणेक्राईम न्यूजमुंबई
Trending

Nalasopra Murder News : नालासोपार्‍यात क्षुल्लक वादातून नायजेरियन नागरिकाची हत्या; डोक्यात काचेची बाटली फोडल्याने जागीच मृत्यू

Nalasopra Nigerian Man Murder News : प्रगतीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री घडली घटना, दोन आरोपी नायजेरियन नागरिकांना अटक

नालासोपारा :- मुंबईजवळच्या नालासोपारा शहरात शनिवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नायजेरियन नागरिकाची क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डोक्यात काचेची बाटली फोडल्याने लकी इकेचकव उईजे (32 वय) या नायजेरियन नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे. Nalasopra Latest Crime News

नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात नायजेरियन नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अयूला बाबाजिदे बार्थलोम (50 वय), ओघेने इगेरे (47 वय) आणि ओडिया इझू पेक्यूलिअर (50 वय) हे तिघे मित्र एका किराणा दुकानाजवळ उभे होते. त्याच वेळी त्यांचा परिचित लकी उईजे तिथे आला. काही वेळातच त्यांच्यात एका क्षुल्लक गोष्टीवरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनी मिळून लकीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर त्याला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपी – अयूला बाबाजिदे आणि ओघेने इगेरे यांना अटक केली आहे. मात्र, ओडिया इझू पेक्यूलिअर हा तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस त्याच्या शोधासाठी विविध पथके तयार करून तपास करत आहेत. नालासोपार्‍यात परदेशी नागरिकांमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0