क्राईम न्यूज

Nalasopra Murder News : खुनाच्या हत्यातील आरोपी सहा वर्षांपासून फरार, तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई आरोपीला जेरबंद

Nalasopra Murder News : खून करून फरार असलेला आरोपी सहा वर्षानंतर पोलिसांनी केली अटक, तुळींज गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई

नालासोपारा :- मोरेगावच्या मौर्या नगर येथील नागरिक कॉलनीत राहणाऱ्या प्रवीण उर्फ सोनू साखरिया (22 वर्ष) याची 3 मे 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्राने चार आरोपींनी प्रवीण याची हत्या केली होती.त्यांचा मृतदेह 90 फुटी रोडच्या कडेला मिळाला होता. पूर्ववैमान्यातून ही हत्या झाल्याचे सांगितले जात होते. या हत्या मधील पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना जेरबंद केले होते. परंतु चौथा आरोपी हा मागील सहा वर्षांपासून फरार होता. आता त्याने आपले अस्तित्व बदलून तो शहरात वावरत होता. त्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधणे अवघड झाले होते. परंतु तुळींज गुन्हे प्रकटीकरण विभागाने सहा वर्षापासून फरार असलेला चौथ्या आरोपीला अटक केली आहे.

तुळींज पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादवि 302,364,201,34 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे तपासात आरोपी भरत राय (25 वर्ष), आशिष कुलकर्णी (21 वर्ष), निशांत मिश्रा ऊर्फ मोनु रायडर (29 वर्ष) आणि प्रिन्स सिंग ऊर्फ पोगो यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न केले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी भरत, आशिष आणि निशांत या तिघांना तात्काळ अटक केली होती. पण गुन्हा घडल्यापासून आरोपी प्रिन्स हा फरार होता. याचा शोध घेऊन अटक करण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते.

तेव्हापासून पाहिजे आरोपी हा त्याचे अस्तित्व लपवून विरार, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई येथे वास्तव्य करत असल्याचे बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती. या आरोपीचा माग काढत असताना गुरुवारी संध्याकाळी विरार कातकरी पाडा येथे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे यांना मिळाली होती. वरिष्ठांना माहिती देऊन त्या ठिकाणी तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रिन्सला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी आरोपीला अटक केले आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago