Nalasopra Drugs News : ‘ब्राऊन शुगर’ची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांचा दणका; नालासोपाऱ्यात 17 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

Nalasopra Latest Drug News : अंमली पदार्थ विक्रीचा डाव उधळला; रिक्षाचालकाच्या घरातही सापडला गुंगीचा साठा
नालासोपारा :- मुंबईजवळच्या नालासोपारा शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर आचोळे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका रिक्षाचालकाला अटक केली. त्याच्याकडून तब्बल 17 लाख 40 हजार रुपये किमतीची 84.04 ग्रॅम ‘ब्राऊन शुगर’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. Nalasopara Drug News
पोलिसांनी असा रचला सापळा
नागरिकांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आचोळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. 18 सप्टेंबर रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नालासोपारा रेल्वे स्टेशनजवळील कॅपिटल मॉलजवळ एक व्यक्ती ‘ब्राऊन शुगर’ विकण्यासाठी येणार आहे.
या माहितीची खात्री पटल्यानंतर, 19 सप्टेंबर रोजी पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी एक संशयित व्यक्ती उभा होता, त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 56.04 ग्रॅम ब्राऊन शुगर सापडली. Nalasopra Police Latest News
घरातही लपवून ठेवला होता साठा
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने आपले नाव समसाद जमसेद अली (वय 24) असे सांगितले. तो मूळचा उत्तराखंडचा असून नालासोपारा येथे रिक्षाचालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला.
पोलिसांनी समसादच्या घराची झडती घेतली असता, त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. घरात आणखी 28 ग्रॅम ब्राऊन शुगर लपवून ठेवलेली होती. या कारवाईत पोलिसांनी एकूण 84.04 ग्रॅम ‘ब्राऊन शुगर’ जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गुरुदास मोरे पुढील तपास करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मंगेश वडणे, गुरुदास मोरे आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते.


