क्राईम न्यूज

Nalasopra Drug Racket : नालासोपाऱ्यात ‘एमडी’ कारखाना उघडकीस; पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निलंबित

Mira Bhayandar Police Take Action On Drug Sumggler : मिरा भाईंदर पोलीस आयुक्तांची तडकाफडकी कारवाई; जितेंद्र वनकोटी यांच्यावर निलंबनाची नामुष्की

नालासोपारा :- मुंबई पोलिसांनी नालासोपारा पूर्वेकडील महामार्गाजवळ असलेल्या रशिद कंपाऊंडमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेला अमली पदार्थांचा (ड्रग्ज) कारखाना उघडकीस आणल्यानंतर, स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी Pelhar Police यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आयुक्तांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. Nalasopra Latest Crime News

14 कोटींचे ‘एमडी’ जप्त

शनिवारी (25 ऑक्टोबर) टिळक नगर पोलीस आणि गुन्हे शाखा 6 च्या पथकाने ही मोठी कारवाई केली. महामार्गाजवळ एका पत्र्याच्या शेडमधील गाळ्यात हा कारखाना छुप्या पद्धतीने चालवला जात होता. यावेळी पोलिसांनी तब्बल 14 कोटी रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केला.

हा कारखाना जवळपास 6 महिन्यांपासून रासायनिक पदार्थ तयार करण्याच्या नावाखाली रात्रीच्या वेळी अमली पदार्थ बनवत होता.

वरिष्ठ निरीक्षकाचे निलंबन

कारखान्याचे ठिकाण पेल्हार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असूनही स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती. याची गंभीर दखल घेत मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सेवेतून निलंबित केले आहे.

पोलिसांमध्ये नाराजी

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ कारखाना सुरू असणे हे स्थानिक पोलिसांचे अपयश असले तरी, कारखान्याशी प्रत्यक्ष संबंध नसताना निलंबनाची कारवाई करणे अन्यायकारक असल्याची भावना अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या हद्दीत अनेक रासायनिक कारखाने आहेत. त्यांची तपासणी करणे शक्य नसते आणि थेट अधिकारही नसतो. अमली पदार्थांच्या कारवाईसाठी स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष असताना, त्यावर कारवाई न करता स्थानिक अधिकाऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही.” विशेष म्हणजे याच अमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रमुख सचिन कांबळे यांना आता पेल्हार पोलीस ठाण्याचे Pelhar Police News वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद देण्यात आले आहे.

यापूर्वी मुंबई पोलिसांनी वसईत दोन वेळा मोठी कारवाई केली होती, तेव्हा स्थानिक पोलिसांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

vivek

Recent Posts