क्राईम न्यूजठाणेमुंबई

Nalasopra Drug Racket Busted : नालासोपारा ड्रग्ज विकणाऱ्या नायजेरियन व्यक्तीला सापळा रचून अटक; 20.40 लाखांचा साठा जप्त

Nalasopra Drug Racket Busted News : वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयासमोर एक नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाणे दहशतवाद विरोधी कक्षा चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला.

नालासोपारा :- वसई विरार महानगरपालिकेच्या शासकीय रुग्णालयाजवळ मोफेड्रोन पावडर (एम.डी.) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन व्यक्तीला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे. Nalasopra Drug News या नायजेरियन व्यक्तीकडून पोलिसांनी 20.40 लाख किंमतीचे अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळींज पोलीस ठाणे दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना गुप्त माहीतीदाराकडून माहीती मिळाली होती कि, अंगावर राखाडी रंगाचा हाफ टि शर्ट व हाफ आर्मा टाईप पैन्ट तसेच डोक्यास काळ्या रंगाची टोपी परिधान केलेला एक नायजेरीयन व्यक्ती हा अंमली पदार्थ विक्री करिता वसई विरार शहर महानगरपालिका रुग्णालय विजयनगर समोरील फुटपाथवर येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांना माहीती दिली. मिळालेल्या बातमीच्या वसई विरार शहर महानगरपालिका रुग्णालय विजयनगर येथे सापळा रचुन नायजेरियन व्यक्ती OGBUEFI IFEANYI IBEH (AGE-49) ठिकाणी यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या नायजेरियन व्यक्तीची तपंचासमक्ष अंगइरडती घेतली असता, त्याचे अंगड़ाडतीमध्ये अंमली पदार्थ मिळुन आला 20.40 लाख किंमतीची ब्राउन रंगाची पावडर असलेला एम, डी. (मेफेड्रॉन) नावाचा अंगली पदार्थ त्याचे प्लॅस्टिक पिशवीसह एकूण वजन 202 ग्रॅम (किंमत 20 हजार रूपये प्रती) अंगझडती मध्ये मिळून आलेला एम.डी. अंमली पदार्थ जप्त करून आरोपी याचेविरुद्ध तुळींज पोलीस ठाणे एन.डी.पी.एस. कायदा 1985 चे कलम 8 क,22 क, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0