•Nalasopra Latest Drug News : प्रगती नगर परिसरात विक्रीसाठी आलेल्या आरोपीवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई
नालासोपारा :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC-2) मोठी कारवाई करत नालासोपारा पूर्वेतून एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात 42 लाख 80 हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. Nalasopra Latest Crime News
आरोपीला अटक, तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा तपास
दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 चे पथक प्रगती नगर, नालासोपारा पूर्व येथील 90 फूट रोडवर गस्त घालत होते. यावेळी कालू बैसे चुक्यूमेका (Kalu Bassey Chukwuemeka, वय 45) या नायजेरियन नागरिकाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. Tulij police Latest News
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात 214 ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी ठेवलेला आढळला. पोलिसांनी तात्काळ हा अंमली पदार्थ जप्त करून आरोपीला अटक केली आहे. Nalasopra Police Latest News
तपासाची चक्रे फिरली
या नायजेरियन नागरिकाविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात (नालासोपारा पूर्व) अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तुळींज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीने हा अंमली पदार्थ कोठून आणला आणि त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन काय आहे, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…