क्राईम न्यूज

Nalasopra Drug News : नालासोपाऱ्यात ‘नकली नशा’चा भांडाफोड! – थेट दारूच्या गोदामावर छापा; परराज्यातून आणलेली दारू भेसळ करून ‘हाय-ब्रँड’ नावाने 12 लाखांना विकणाऱ्या आरोपीला अटक!

Nalasopara Drug News : रसायन आणि स्वस्त दारू मिसळून तयार होत होती बनावट ‘प्रीमियम व्हिस्की’; गुन्हे शाखेच्या कारवाईने अवैध धंद्यावर मोठा प्रहार

वसई :- मुंबई उपनगराला लागून असलेल्या नालासोपारा परिसरात बनावट आणि भेसळयुक्त दारू तयार करणाऱ्या एका अवैध कारखान्याचा गुन्हे शाखा कक्ष-2 (वसई) Vasai Crime Branch Unit 2 च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. परराज्यातून कमी किमतीची दारू आणून, त्यात रासायनिक मिश्रण करून उच्च प्रतीच्या ‘हाय-ब्रँड’ कंपन्यांच्या नावाने ती बाजारात विकण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Vasai Crime Branch Unit 2 Latest News

तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्व, बावशेतपाडा येथील ठाकुर चाळीत एका खोलीत हा गोरखधंदा सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी या गोदामावर छापा टाकला. Nalasopara Drug Busted News

या कारवाईत धर्मराज बाबुलाल निशाद (वय 55 वर्ष) या आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. आरोपी दिव-दमण आणि गोवा येथून बेकायदेशीरपणे स्वस्त दरातील दारू आणायचा. ही दारू उच्च प्रतीची भासावी यासाठी त्यामध्ये रासायनिक आणि इतर पदार्थांची भेसळ केली जाई. त्यानंतर ती ‘Mc. Dowell’s No. 1’, ‘IMPERIAL BLUE’, ‘PREMIUM WHISKY’ यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या बॉटलमध्ये भरून, त्यावर बनावट सीलिंग आणि लेबलिंग करून बाजारात विकली जात होती.

पोलिसांनी गोदामातून उच्च प्रतीच्या कंपन्यांच्या 750 मिली आणि 180 मिलीच्या एकूण 368 दारू भरलेल्या बाटल्या, तसेच रिकाम्या बाटल्यांच्या 13 गोण्या, 1100 टोपणे आणि भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक मिश्रण जप्त केले. बाजारभावानुसार या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे 12 लाख रुपये इतकी आहे.

या कारवाईमुळे मानवी आरोग्याला घातक ठरणारा हा अवैध धंदा उघडकीस आला असून, आरोपीवर तुळींज पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे आणि त्यांच्या पथकाने केली.

vivek

Recent Posts