क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Nalasopra Crime News : नालासोपाऱ्यात पावणे दोन कोटींची ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त! तुळींज पोलिसांच्या जाळ्यात दोन मोठे तस्कर

Nalasopra Breaking News : प्रतिबंधित ‘अंबरग्रीस’ची विक्री करण्याचा डाव फसला; पालघर आणि ठाण्यातील आरोपींना बेड्या, गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई

वसई/नालासोपारा l शासनाने प्रतिबंधित केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना तुळींज पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगर परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत 1 किलो 858 ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 1 कोटी 85 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.Nalasopra Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी 2026 रोजी तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना एक इसम 90 फिट रोडवर प्रतिबंधित पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात दबा धरून सापळा रचला. संशयित आरोपी कादर गफार करगथरा (वय 52, रा. जव्हार, पालघर) हा तिथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये काळसर-पिवळसर रंगाचा, मेणासारखा दिसणारा 1 किलो 858 ग्रॅम वजनाचा अंबरग्रीसचा साठा मिळून आला. Nalasopra Police News

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा साठा त्याला ठाण्यातील कासारवडवली येथील रहिवासी किशोर महादेव तपसाळे (वय 39) याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमान्वये तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0