क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Nalasopra Crime News : नेपाळहून नालासोपाऱ्यात गांजाची तस्करी; आंतरराष्ट्रीय टोळीतील तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Nalasopra Police Seized Ganja Smuggling : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई; 14 किलो गांजा जप्त, बिहारचे तीन आरोपी अटकेत

नालासोपारा l मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयांतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष-2 ने एक मोठी कारवाई करत नेपाळमधून नालासोपाऱ्यात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय तस्करांना अटक केली आहे. नालासोपारा पूर्व येथील रहमत नगर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण 14 किलो 37 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे 2 लाख 80 हजार 740 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. Nalasopra Crime News

कारवाईचा घटनाक्रम: दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पथक तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी रहमत नगरमध्ये तीन तरुणांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेले आरोपी

1) मो. चाँद अख्तर अली फकीर (वय 26)

2) मो. शाकीर तस्लीम फकीर (वय 26)

3) रंजनकुमार शिवनारायण साफी (वय 32 )

हे तिन्ही आरोपी बिहार राज्यातील मधुबनी जिल्ह्याचे रहिवासी असून, त्यांनी हा गांजा नेपाळ देशातून खरेदी केला होता.

छुप्या मार्गाने तस्करी

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी हा गांजा नेपाळमधून खरेदी करून छुप्या मार्गाने भारतात आणला आणि तो नालासोपारा परिसरात विक्री करण्यासाठी आले होते. या तिन्ही आरोपींविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश पचळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0