Nalasopra Crime News : पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी : रिक्षा व दुचाकी चोरी करुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, 4 गुन्ह्यांची उकल
Nalasopra Crime News: सराईत आरोपींची कबुली वसई, मुंबई, अंधेरी या परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात सांगितले आहे
नालासोपारा :- रिक्षा व दुचाकी चोरी करुन घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या Pelhar Police Station पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून 4 गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Nalasopra Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष भवनच्या गवराई नाका येथील शारदा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या योगेंद्र यादव (52 वय) यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली होती. त्यांनी 22 डिसेंबरला रात्री अपार्टमेंटमध्ये दुचाकी पार्किंग केली होती. चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याने पेल्हार पोलिसांनी 22 डिसेंबरला वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या घटनास्थळी पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन घटनास्थळ परिसर ते मिरारोड असे एकूण 60 ते 70 ठिकाणचे सीसीटी फुटेज तपासले. पोलिसांच्या बातमीदार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे साबिरअली शेख उर्फ फत्ते (28 वय) याला गुन्ह्यात चोरी केलेल्या 2 रिक्षा व 1 दुचाकीसह ताब्यात घेतले. नंतर त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून सॅमसंग आणि रेडमी कंपनीचे 2 मोबाईल मिळून आले. आरोपीकडे चौकशी व तपास केल्यावर गुन्ह्यात चोरी केलेला 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून 4 गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीच्या ताब्यात मिळून आलेल्या मोबाईलची माहिती घेतल्यावर त्याने त्याचे साथीदाराने मिळून दोन्ही मोबाईल अंधेरी येथील कॅफे शॉपमधून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हा सराईत असून मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 8 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आरोपीने वसई, मुंबई, अंधेरी या परिसरात चोऱ्या केल्याचे तपासात सांगितले आहे. Nalasopra Latest Crime News
पोलीस पथक
जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडल 3, विरार, बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सचिन कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, दुर्गा चौधरी पोलीस निरीक्षक (गुन्हे), पेल्हार पोलीस ठाणे, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि रमेश वाघचौरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मीक पाटील, मिथुन मोहिते, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, वसिम शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.