क्राईम न्यूज

Nalasopra Crime News : 10 वर्षांपासून नालासोपाऱ्यात वास्तव्य; पाळत ठेऊन 2 बांगलादेशींना नालासोपारा येथून घेतलं ताब्यात

Nalasopra Tuilj Police Arrested Bangladeshi Migrants : नालासोपारामध्ये 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

नालासोपारा :- नालासोपारामध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. Nalasopra Police Arrested Two Bangladeshi People तुळींज पोलिस ठाण्याच्या Tulij Police Station हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे बांगलादेशी नालासोपारात वास्तव्यास होते.

राज्यात अवैध बांगलादेशी स्थलांतरीतांवर होणाऱ्या कारवाईला आता वेग आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाकरे ह्यानंतर नालासोपाऱ्यात देखील 2 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आलेली आहे. यात दोन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. तुळींज पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांना अटक केली. मागील दहा वर्षांपासून दोघेही जण नालासोपाऱ्यात वास्तव्याला आहे.

अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-नालासोपारा यांना बातमीदारामार्फत तुळींज पोलीस ठाणे हद्दीतील आर. सी. मारूती हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज समोर, हाई टेन्शन रोड, प्रगती नगर, नालासोपारा पूर्व या ठिकाणी बांगलादेशी नागरीक विनापरवाना अनाधिकृतपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक, पंचांसह प्रगती नगर, नालासोपारा पूर्व या ठिकाणी सापळा रचुन सिद्दीक सत्तार शेख, (वय 38 रा. नालासोपारा पुर्व., मुळ रा. बांग्लादेश,) मुन्ना विजय डे (वय 25 रा. नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर, मुळ रा. बांग्लादेश ) या बांग्लादेशी नागरीकांना ताब्यात घेवून चौकशी केली असता, ते भारतात कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतीय सिमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरीक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश केल्याचे सांगितले.सिद्दीक सत्तार शेख हे मागील 10 वर्षापासून मुन्ना विजय डे हा लहानपासून अवैधरित्या भारतात आल्याचे आणि राहत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपीवर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक
पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा नालासोपारा युनिटचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार, महिला पोलीस हवालदार साक्षी डोईफोडे, पोलीस हवालदार रोशन किणी, पोलीस हवालदार महेंद्र शेटये, अमित चव्हाण,सुनिल पागी, या सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांनी उत्कुष्ठरित्या केली आहे.

vivek

Recent Posts