Nalasopra Crime Branch Arrested Drug Smuggler : आठ किलो 214 ग्रॅम गांजा बेकायदेशीर रित्या बाळगणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांकडून अटक
नालासोपारा :- गांजा स्वतःजवळ बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police Station अटक केली आहे.आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 8 किलो 214 ग्रॅम इतका गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. Nalasopra Latest Crime News
नालासोपारा, भाईंदर, मिरा रोड आणि विरार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस या परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात गस्त घालत आहेत. गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा पोलिसांचे एक पथक मुंबई अहमदाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना हॉटेल करिइमा समोरील अहमदाबाद कडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडच्या सर्विस रोडवर साईडला उपवासलेल्या वाहनांच्या जवळून जात असताना वाहनाच्या आडोशाला एक व्यक्ती मोटरसायकलच्या बाजूला संशयितरित्या पाठीवर सॅक घेऊन उभा होता. पोलिसांना व्यक्ती बाबत संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे आठ किलो 214 ग्रॅम वजनाचा गांजा ज्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये हा अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एन.डी.पी. एस. कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केकाणे करीत आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कदम नायगांव पोलीस ठाणे, तसेच गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीराचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेद्र थापा, पोलीस हवालदार सुधीर खोत, सचिन हुले, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे तसेच नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अशोक सपकाळ, पोलीस अंमलदार अझहर मस्ते, प्रकाश आगिवले, यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…